धरणगाव नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता नगरपरिषद सभागृहात काढण्यात येणार आहे. यामुळे धरणगावच्या राजकीय वातावरणाला आता गती मिळणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर परिषदेच्या वतीने प्रभाग निहाय सदस्य पदाचे आरक्षण जाहीर करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी मंगळगवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.