अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे साई चरित्र कथा सुरू आहे. यावेळी कथेला आलेले तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांना समाधान महाराज यांनी तिरुपती बालाजी मंदिरात साई चरित्र कथा पारायण सोहळा घेण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीला सौरभबोरा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तिरुपती बालाजी मंदिरात लवकरच साई चरित्र कथा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असा सांगितले.