आगामी गणेशोत्सव, ईद मिलादुन्नबी आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज 23 ऑगस्टला दुपारी बुलढाणा शहर पोलिसांकडून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील प्रमुख भागांतून पोलिसांनी जोरदार रूट मार्च काढत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश दिला.