मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून आज गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. आम्ही दरवर्षी राज ठाकरे यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो. मात्र यंदा इतरही काही जण आले आणि यानिमित्ताने कुटुंब एकत्र आले, याचा आनंद वाटत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.