Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस उपनिरीक्षक अशोक माने यांनी ही भागात गस्तघातली. त्यावेळी बेकायदा वाळू वाहतूक करणारे दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर नांदूरढोक शिवारात पकडले. दोन्ही ट्रॅक्टर व त्यात भरलेली वाळू असा ११ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक दीपक घंगाळे व सागर दीपक चिखले (दोघे, रा. नांदुरढोक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.