घारगाव परिसरात बस प्रवासात वयोवृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू पुणे–धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधील प्रवासादरम्यान एका वयोवृद्ध प्रवाशाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल वामन पाटील (वय 72, रा. बोरी, ता. पारोळा, जि. जळगाव) असे असून, ते पत्नी मंगलबाई यांच्यासह चिंदखेडा आगाराच्या एसटी (क्रमांक MH-14-LX-9822) बसमधून पुण्यावरून धुळ्याकडे प्रवास करत होते