नरखेड तालुक्यातील खडकी येथील शेतकरी प्रशांत खरपकर वय 50 वर्ष यांनी 18 ऑगस्टला रात्री सात वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन केले त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान 31 ऑगस्ट ला त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत यांच्याकडे साडेचार एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे दोन लाख 35 हजार रुपये कर्ज आहे. तसेच दोन लक्ष रुपये खाजगी कर्ज देखील आहे