हिंगणघाट:जाम हिंगणघाट रोडवरील रस्त्यावर रिमडोह शिवारात सत्कार हॉटेलजवळ पोलिसांनी अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत ९७६ ग्रॅम गांजासह दुचाकी, मोबाईल असा एकुण १ लाख ४३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक सा. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार देवेद्र ठाकुर, पोलीस यांचे आदेशाने डिबी पथकाने केली आहे.