शाश्वत शेती,समृद्ध शेतीचा नारा देत नेहरु मैदान रामटेक येथे शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता पर्यंत शेतकरी समृद्धी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यात्मिक विश्वगुरू श्री श्री रविशंकर प्रामुख्याने उपस्थित होते.शेतकऱ्यांनो आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका असे आव्हान करीत गोरक्षा आणि कृषी ही देशाची संपत्ती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.