मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर ते आंदोलन करत आहेत. जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी राज्याभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा बांधव मुंबईत आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, तर सीएसएमटी स्थानकावर देखील मराठा बांधवांचा जनसागर दिसून येत आहे. अशातच आज दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरा रोड येथून देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहे.