धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे कपाशीवर कीटकनाशक फवारणीनंतर प्रकृती बिघडल्याने २२ वर्षीय सुनील न्हानू भिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २१ ऑगस्ट रोजी रोजंदारीवर फवारणीचे काम करून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थता जाणवली व कुटुंबीयांनी तातडीने धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, २२ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.