अयोध्या नगर परिसरातील एका महिलेच्या घरात गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या वेळी तोंडाला रूमाल बांधलेल्या चार अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून २ लाख ३९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घरात घुसून महिलेला आणि तिच्या मुलाला धमकावून हा गुन्हा करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.