बीड विधानसभा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीत भेट घेतली. 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला डॉ. क्षीरसागर यांनी पाठिंबा जाहीर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि हा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, असे त्यांनी सांगितले.