11 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा्क अमली पदार्थ विरोधी पथकाने जुना दिघोरी नाका येथे छापा मार कार्यवाही करून एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव शफिक खान असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून 102 ग्राम एमडी, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण पाच लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.