गडअहेरी तालुक्यातील खराब रस्त्यांच्या विरोधात ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता गडअहेरी-बामणी फाट्याजवळ भव्य चक्काजाम आंदोलन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतु मडावी करणार आहेत.