पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारताला क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून संसद क्रीडा महोत्सव 2025 चे पालघर जिल्ह्यात देखील आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो-खो व्हॉलीबॉल असे दहा खेळ आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून नोंदणी 20 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे. सर्व विद्यार्थी तरुण तरुणी खेळाडू सहभागी होऊ शकतात सर्वांनी ऑनलाइन नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरांनी केले आहे.