हिंगणघाट शहरातील हरीओम सभागृहात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ओबीसींच्या आरक्षणा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र शासन निर्णय २ सप्टेंबर २०२५ च्यानुसार मराठा समाजाचे ओबीसीकरण होत असल्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. या शासन निर्णयामुळे ओबीसीवर होत असलेला अन्याय दुर करण्यात यावा असे बैठकीत ठरविण्यात आले. यासंबंधीचे निवेदन १२ सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.