आरोपी गुरुप्रसाद शिवा धुमाळ, सागर राठोड, चेतन सिदमल्ले व शिवा धुमाळ (रा. नळदुर्ग) यांनी दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9.30 वाजता अविनाश भारत जाधव (वय 30, रा. आयोध्या नगर, नळदुर्ग) यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व लोखंडी लेझीमने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.