नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला या गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान रान भाजी जत्रा महोत्सव साजरा करण्यात आला. संसदरत्न माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांची या रानभाजी जत्रा महोत्सवाला प्रमुख उपस्थिती होती. तब्बल 48 प्रकारच्या विविध रानभाज्या या जत्रेत समाविष्ट करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला नागेश पाडवी किरसिंग वसावे नितेश वळवी प्रताप वसावे सांगल्या वळवी रामसिंग वळवी आदि उपस्थित होते.