लाखनी नगरपंचायतीच्या हद्दीत प्रथमच भूमिगत जलनिस्सारण (Underground Drainage System) यंत्रणेचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे. नगरपंचायतीचे नगरसेवक विपुल कांबळे यांनी आपल्या प्रभाग क्र. १ मध्ये या अभिनव संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. यामध्ये लहान रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असलेले दोन्ही बाजूंचे नाले विसर्जित करून रस्त्याच्या मधोमध भूमिगत जलनिस्सारण यंत्रणा बसविण्यात आली. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होऊन वाहतूक सुलभ झाली.