बहुजन विकास अभियान महिला आघाडीच्या वतीने तसेच लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आठ तारखेपासून बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,मानसिंग पवार हे विश्वशांती बौद्ध विहाराचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे,उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाटणे सत्याग्रह करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय