लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असून, बेकायदेशीर खरेदीदारांनी शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीवर तुडवण्याचे प्रकार समोर आले आहेत. व्यापारी आपल्या मनमानी दराने खरेदी करून शेतकऱ्यांना पडेल त्या भावात विकायला भाग पाडतात. धक्कादायक म्हणजे, या लुटीत बाजार समितीतील काही विद्यमान संचालकांचेही हात असल्याची चर्चा गावोगाव सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनवणाऱ्या या प्रकारामुळे कृषी क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.