चंद्रपूर जिल्ह्यातील कावेरी या कंपनीकडून कामगारांवर अन्याय होत असून या संदर्भात सात जून रोजी कंपनी समोर आंदोलन केल्यानंतरही याकडे कामगार विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या सात दिवसात कामगारांना न्याय न मिळाल्यास कामगार कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिला आहे.