सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गादर्शनाखाली ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले. आजच्या बैठकित नागरी सेवा सुविधा विभागाचे दोन अर्ज दाखल झाले होते, या अर्जाची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या. या कार्यक्रमास परिवहन विभाग व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर उपस्थित होते.