जिवती पोलीस स्टेशन जिवती येथे 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गुप्त माहिती मिळाली की सेनगाव येथे राहणारा संभाजी कत्ते हा इसम स्वतःच्या राहत्या घरी अवैद्यरित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक मुंमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्जनाखालील जिवती पोलीस स्टेशन ने पथक तयार करून धाड टाकली असता आरोपीला जिवती पोलिसांनी अटक केली असून समोरील तपास सुरू आहे.