राहुरी नगर परिषदेत हद्दीतील नागरिकांच्या घरपट्टी नळपट्टींसह इतर अन्य कराच्या थकबाकीवर दोन टक्के दराने दंड व्याज आकारले जात असल्याने मालमत्ता कराच्या रकमेपेक्षा शास्तीकर चा दंडच जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हा शास्ती कर माफ करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी केली असून त्यांनी याबाबत आज सोमवारी दुपारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन दिले आहे