आयुष कोमकर हत्याप्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी कालच बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली