आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेलं भंडारदरा धरण आज पहाटे पूर्ण क्षमतेने भरलं आहे.भंडारदरा धरणाचा पाणी साठा आता 11 टीएमसी वर पोहोचला असून धरणाच्या स्पिलवे गेटमधून पहाटे 12000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. मात्र पाणलोठ क्षेत्रात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या 20,000 क्युसेकना विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी हरीश चकोर यांनी दिली आहे.