रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल ५० लाख रुपयांचे ५०४.३४ ग्राम सोने चोरणाऱ्या बँकेच्या शिपायाला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार तासात अटक केली .या सर्व प्रकरणात बँकेचा कॅशियर आणि मुख्याधिकारी यांनीही संगणमताने हा गुन्हा केला असल्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.