राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे कार्यकर्ता व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना यावेळी बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.तर युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर जो होईल तो कार्यकर्त्यांनी स्वीकारून काम करावे अशा सूचना यावेळी दिल्या.