आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद व नवरात्र उत्सव शांततेत व नियमांनुसार साजरे करण्याचे आवाहन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. उत्सवादरम्यान डीजे वापरास कायदेशीर बंदी असून विनापरवाना लाऊडस्पीकर व लेझर लाईटचा वापर केल्यास कठोर कारवाई होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळणे बंधनकारक असून त्याचा वृद्ध, गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.