संगमनेरात शिंदे यांच्या सभेत गोंधळ – कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज संगमनेर – गेल्या दोन-तीन दिवसांपासून संग्रामबापू भंडारे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद राज्यभरात चर्चेत असताना, आता शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभास्थळी झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.