हणमंतवाडी ( मु) येथील अंतर्गत रस्ते, नाल्यांची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी दि.06.09.2025 मौजे हणमंतवाडी ( मुगाव) गावातील सर्व रस्त्याची दुरावस्था झाली आहे तसेच गावातील अंतर्गत सांडपाणी कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचे तक्रारी गावकरी करत असल्याने आज गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय मुगाव हणमंतवाडी येथे निवेदन दिले आहे. हणमंतवाडी गावात वडार वस्ती आहे वडरवस्तीतील एकही रस्ता माणसाला चालण्याच्या योग्यतेचा राहिला नाही.