नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार वेरुळमध्ये महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली.एसडीएम संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.भाविक व पर्यटकांसाठी वेरुळ-खुलताबाद परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करणे ठरले.वाहनतळ, रस्त्यांचे डायव्हर्जन, सीसीटीव्ही, कचरा व्यवस्थापन यावर चर्चा झाली. हेलीपॅड, प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातील बेड वाढविण्याचे ठरले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी आरोग्य पथके तैनात करणे आदि सुचना दिल्या.