कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागात बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक झाली होती. या प्रकारामुळे परिसरासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या शहर पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमाजी सुंबे हे या हाणामारीत व दगडफेकीत जखमी झाले होते. या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.