आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणीच्या कामाच्या सध्यस्थिती संदर्भात आढावा घेतला. या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव व दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.