नाशिक रोड जय भवानी रोड परिसर हा बिबट्यांचा परिसर झाला की काय असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण या परिसरात प्रत्येक आठवड्याला बिबट्या नजरेत पडत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने लवकरात लवकर पिंजरे लावून या बिबट्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.