धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील खेड येथे इस्लाम धर्माचे प्रेषित व शांततेचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या ईद ए मिलादुन्नबी (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला फातिहा ख्वानी करण्यात आली. त्यानंतर गावातून जुलूस काढण्यात आला. ही मिरवणूक ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास काढण्यात आली.