हिंगोली महसूल विभागाने सेवा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ‘सेवा दूत’ प्रणालीद्वारे लोकांना आवश्यक कागदपत्रे आणि खर्चाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केल्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक केले आहे. अशी माहिती प्राप्त झाली.