दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान पठाणटोला शेत शिवारात धु-यावरून घसरून खाली बांधीत पडल्यामुळे मृतक नंदलाल लिंगे वय 61 वर्षे यांचा मृत्यू झाला. मृतक हे धानाची पाहणी करण्याकरिता शेतात गेले होते. यातच धान पिकाची पाहणी करीत असताना धूर्यावरून घसरून खाली बांधीत पडल्यामुळे मरण पावले असावेत. असे फिर्यादी राजकुमार लिंगे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान मर्ग दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.