सहयोग संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयेशचंद्र रमणजी रमादे यांच्या मातोश्री स्व. लता रमादे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गोंदिया येथील जिल्हा शासकीय केटीएस रुग्णालय आणि गंगाबाई महिला रुग्णालयात फळे आणि अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत लता रमादे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णालयांमध्ये नियमितपणे फळे आणि अन्नपदार्थांचे वाटप केले जाते. यावेळी सहयोग परिवाराचे अध्यक्ष श्री रमण रमादे,जयेश रमादे, विलास वासनिक, जे.के.लोखंडे, मंगेश कठाणे, कमल हटवार उपस्थित होते.