मलगी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होवून अंगणवाडी मदतनीस महिला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाले होते. ३ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.चिखली तालुक्यातील मलगी येथील रहिवाशी अंगणवाडी मदतनीस श्रीमती शोभाबाई रमेश परिहार वय ४५ वर्ष ह्या २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घरात स्वयंपाक करत असतांना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या गॅस स्फोटामध्ये श्रीमती शोभाबाई रमेश परिहार व मुलगा राजेश रमेश परिहार हे दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.