परतवाडा अंजनगाव रोडवरील येणी पांढरी शिवारात ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पैशांच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धावर लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अचलपूर परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवदास दान्नु नागले (वय ७०, रा. गिरगुटी, ता. चिखलदरा, ह.मु. येणी पांढरी, ता. अचलपूर) हे नमूद वेळी शिवारात असताना आरोपीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने "जवळ पैसे नाहीत" असे सांगताच आरोपीने वाद घालत त्यांना शिवीग