फिर्यादी संजय शालिकराम येवले यांच्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपी नंदकिशोर इंगळे हा फिर्यादीचे भाऊ दीपक येवले याच्यासमोर पाटील लोकांना शिवीगाळ करत असल्याने दीपक येवले यांनी आरोपीस हटकले असता आरोपीने त्याच्यासोबत वाद करून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी 23 ऑगस्टला दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.