चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खडे व खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. अपघाताचा धोका लक्षात घेता चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी ही बाब माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली व माजी खासदार डॉक्टर नेते ॲक्शन मोडवर आले.