मराठा समाजासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय. बुधवार दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ओबीसी समाजातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. यावेळी आंदोलकांनी आक्रमक भुमीका घेत सुरुवातीला गेट तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिपक बोर्हाडे यांना जिल्हधिकारी यांच्या दालनात जावून न दिल्याने त्यांनी देखील जिल्हाधिकारी यांच्या दालनाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.