वसई विरार परिसरात मोठ्या संख्येने आगरी, कोळी बांधव वास्तव्य करतात, आगरी कोळी बांधवांमध्ये गणेशोत्सवाप्रमाणे गौरी सणाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. गौराईचे ठीक ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत झाले आहे पारंपारिक वेशभूषा परिधान करून नाचत गात महिलांनी गौराई डोक्यावर नाचवत गौराईचे घरोघरी सार्वजनिक गौरी मंडळांमध्ये जल्लोषात स्वागत केले.