अमळनेर शहरातील हेडावे नाका येथे तंबाखू न देण्याच्या कारणावरून एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्र १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पहाटे ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.