निफाड (वार्ताहर) : निसाकाची १२७ एकर जमिन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरीत थांबवावी. कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामुग्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी काल मंगळवारी निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम यांचे नेतृत्वाखाली निसाका संघर्ष समिती व सभासद, कामगारांच्यावतीने निफाड तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात तहसीलदार विशाल नाईकवाडे याना निवेदन दिले