हिंगोली जिल्ह्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबवून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याच्या पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या वाहनाला प्रतिसाद दिला असून हिंगोली जिल्ह्यात ७१० पैकी तब्बल ३१३ गावामधून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यामुळे गावात एकोपा राहण्यास मदत होणार असून पोलिसांचाही बंदोबस्ताचा ताण हलका झाला आहे अशी माहिती आज पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली.